Mahogany

महोगनी

“पर्यावरणासाठी टिकाऊ, सुंदर आणि मजबूत – महोगनीचा निवड करा!”

नोकरीतून निवृत्त होता येते, मग शेतीतून का नाही..? आम्ही शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहे महोगनी लागवड.

महोगनी हा एक दीर्घायुषी आणि उंच वाढणारा वृक्ष आहे. या वृक्षाचे लाकूड अत्यंत टिकाऊ, मजबूत आणि आकर्षक असते, ज्यामुळे त्याला फर्निचर, सजावटीच्या वस्तू आणि संगीत वाद्यांच्या निर्मितीमध्ये मोठी मागणी असते. महोगनीचे झाड उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रात उत्तम प्रकारे वाढते. हे झाड पर्यावरणासाठी उपयुक्त असून हवेतील कार्बन डायऑक्साईड कमी करण्यात मदत करते.

फायदे:

  • महोगनीच्या झाडांचे लाकूड कीटक व बुरशी प्रतिरोधक असल्याने दीर्घकाळ टिकाऊ असते.
  • महोगनीच्या झाडांमुळे कार्बन क्रेडिट (Carbon Credit) मिळवण्याची संधी मिळते, कारण या झाडांद्वारे हवेतील कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात शोषले जाते, ज्यामुळे कार्बन फुटप्रिंट कमी होते.
  • महोगनीचे लाकूड वळणक्षम असल्यामुळे त्याचा वापर कलात्मक वस्तू आणि नाजूक डिझाइन्स तयार करण्यासाठी होतो.
  • हे झाड जमिनीची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते, कारण त्याच्या पानांच्या गळतीमुळे जमिनीत नैसर्गिक खत तयार होते.
  • महोगनीचे झाड हवेतील धूळ आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे पर्यावरणाची शुद्धता टिकवून ठेवता येते.

वैशिष्ट्ये:

  • हे झाड कमी देखभालीतही वाढू शकते, ज्यामुळे त्याची लागवड आणि पालनपोषण करणे सोपे होते
  • महोगनीचे झाड उष्णकटिबंधीय हवामानात अतिशय चांगले वाढते आणि ते उंच व सरळ वाढणारे असते.
  • या झाडाचे लाकूड नैसर्गिकरित्या आकर्षक लालसर तपकिरी रंगाचे असते, जे काळाच्या ओघात अधिक गडद आणि सुंदर होते.
  • या झाडाचे लाकूड अत्यंत दणकट असते, ज्यामुळे त्याचा वापर जहाजबांधणी आणि उच्च प्रतीच्या इमारतींमध्ये केला जातो.
  • महोगनीच्या लाकडाचे काम करण्यास सोपे असते, त्यामुळे ते खांब, दरवाजे, खिडक्या आणि विविध इतर घरगुती वस्तू तयार करण्यासाठी उपयुक्त असते.
  • याच्या लाकडाचा वापर जलरोधक फर्निचर आणि बाह्य सजावटीच्या वस्तूंसाठी केला जातो.

लागवड पद्धत:

  • जमीन: लागवडीसाठी निचरा होणारी आणि सुपीक जमीन सर्वोत्तम असते, पण हे झाड विविध प्रकारच्या जमिनीत वाढू शकते.
  • लागवड पद्धत: १०x१० फूट अंतरावर ४५०-५०० रोपे एकरी लावता येतात.
  • पाणी व्यवस्थापन: सुरुवातीच्या काळात नियमित पाण्याची आवश्यकता असते.
  • रोपांच्या चांगल्या वाढीसाठी आणि लाकडाच्या गुणवत्तेसाठी दरवर्षी योग्य छाटणी करावी.
  • रोपे शेताच्या बांधावरसुद्धा लावता येतात.
  • आंतरपीक सुद्धा घेता येते.

उत्पन्न क्षमता:

  • एकरी ५०० झाडे.
  • मोहगनी चे बी ५०/किलो, एका झाडाला ५ किलो. म्हणजेच ५x५००x५० = १,२५,०००/एकर.
  • ५व्या वर्षापासून (Carbon Credit) ने साधारणतः २५,०००/ एकर मिळू शकते.
  • १०-१२ व्या वर्षी १ झाड कापून १५-२० घन फूट लाकूड मिळते.(३ फूट गोलाई). आजचा भाव १२००/ घन फूट आहे.
  • कमित कमी १२ वर्षी पण ५०० भाव असला तरी, ५००x५००x१५ = ३७,५०,०००/एकर मिळू शकते.
Scroll to Top