BurmaTeak

बर्मा सागवान

“टिशू कल्चरने वाढवलेले, उच्च गुणवत्तेचे बर्मा सागवान!”


वैशिष्टे:

  • उच्च दर्जाचे लाकूड: बर्मा सागवानाचे लाकूड उच्च प्रतीचे आणि टिकाऊ असते, ज्यामुळे याचा वापर फर्निचर, बांधकाम आणि सजावटीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.
  • टिशू कल्चरद्वारे निर्मित: आमच्या बर्मा सागवानाची उत्पादन प्रक्रिया टिशू कल्चरद्वारे केली जाते, ज्यामुळे उच्च दर्जाची आणि एकसमान गुणवत्ता सुनिश्चित होते.
  • जलद वाढ: योग्य वातावरण आणि देखभालीमुळे बर्मा सागवानाची वाढ जलद गतीने होते.
  • उत्तम पोत: लाकडाचा सोनेरी तपकिरी रंग आणि आकर्षक पोत यामुळे हे लाकूड फर्निचर आणि सजावटीच्या वस्तूंसाठी अत्यंत लोकप्रिय आहे.
  • कीटक प्रतिकार: बर्मा सागवानाचे लाकूड कीड, बुरशी आणि हवामानाच्या परिणामांपासून नैसर्गिकरित्या सुरक्षित असते.
  • दीर्घायुष्य: या लाकडाचे आयुष्य दीर्घकाळ टिकणारे असून, याचा वापर शतकानुशतके केला जाऊ शकतो.
  • बर्मा सागवान (Tectona grandis) ही जगातील सर्वोत्कृष्ट सागवान प्रजातींपैकी एक आहे. हे झाड मूळचे दक्षिण आशियातले आहे आणि त्याचे लाकूड उच्च दर्जाचे, टिकाऊ आणि आकर्षक रंगाचे असते. बर्मा सागवानाच्या झाडाची लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मानली जाते कारण याचे लाकूड बाजारात मोठ्या मागणीला आहे.

लागवड पद्धत:

  • लागवड पद्धत: १०x१० फूट किंवा १२x१२ फूट अंतरावर रोपे लावा. यामुळे झाडांना योग्य जागा आणि पोषण मिळते.(५०० झाडे)
  • पाणी व्यवस्थापन: लागवडीच्या सुरुवातीच्या काळात नियमित पाणी देणे आवश्यक आहे.
  • खते आणि औषधोपचार: झाडांच्या निरोगी वाढीसाठी १५-१५-१५ प्रमाणात एन.पी.के खतांचा वापर करा. कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची आवश्यकता असल्यास वापरा. रोपे शेताच्या बांधावर लावता येतात.
  • आंतरपीक सुद्धा घेता येते.

फायदे:

  • उच्च आर्थिक लाभ: बर्मा सागवानाचे लाकूड अत्यंत मौल्यवान आहे, ज्याला बाजारात चांगला दर मिळतो, त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक लाभ होतो.
  • कार्बन क्रेडिट: बर्मा सागवानाच्या लागवडीमुळे कार्बन क्रेडिट्स मिळू शकतात, ज्यामुळे पर्यावरणीय आणि आर्थिक फायदा मिळतो.
  • पर्यावरणीय फायदे: बर्मा सागवान जमिनीचे संरक्षण, कार्बन शोषण, आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करते.
  • कमी देखभाल: एकदा योग्य पद्धतीने लागवड केल्यानंतर बर्मा सागवानाला फारशी देखभाल लागत नाही, ज्यामुळे ती सुलभ आणि कमी खर्चिक होते.
  • दीर्घकालीन गुंतवणूक: बर्मा सागवानाचे लाकूड दीर्घकाळ टिकणारे आहे, ज्यामुळे ही लागवड दीर्घकालीन आणि फायदेशीर गुंतवणूक ठरते

उत्पन्न क्षमता:

  • प्रति एकर ५०० झाडे १०-१२ व्या वर्षी एक झाड कापून १५ ते २० घनफूट इतके लाकूड मिळते. (३ फूट गोलाई).
  • आजचा भाव ₹ १५००/घनफूट लाकूड १ झाड = १५००x५०० = ₹२२,५०० रुपये इतकी होते.
  • ५०० झाडे/एकर × ₹ २२,५०० = १,१२,५०,००० रुपये इतके उत्पन्न होते त्यातून २,५०,००० रुपये खर्च जरी गृहीत धरला तरी १ कोटी १० लाख इतका नफा हा ५०० झाडापासून मिळतो प्रति वार्षिक = १० लाख रुपये आंतरपीक चे उत्पादन अधिक.

तुम्ही उच्च दर्जाचे बर्मा सागवान शोधत आहात का? “उत्तम दर्जा, जलद वाढ – टिशू कल्चरद्वारे निर्मित बर्मा सागवान!” बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा..

Scroll to Top